अवैध बनावटी शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना केले जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस पथकाची कारवाई...

Shabd Sandesh
0


गोंदिया,दि.29 : 

       मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


 या अनुषंगाने दिनांक 28/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया ग्रामीण हद्दीत कारवाई करत अवैध शस्त्र बाळगुन दहशत माजविणारा इसम नामे- 1) रेहान फजुला बेग वय 18 वर्षे राहणार- सहायता नगर, फुलचुर टोला गोंदिया यास लोखंडी दांडा असलेल्या वेल्डिंग केलेल्या चैन व्हील बनावटी शस्त्र व दोन लोखंडी धारदार तलवारी सह ताब्यात घेतले . तसेच रामनगर पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बोरकुटे, यांचे मार्गदर्शनात कारवाई करत रामनगर हद्दीतील सूर्याटोला बांधतलाव परिसरातून अवैध शस्त्र  चाकू बाळगणारा इसम नामे - 2) आकाश उर्फ डबल राधेश्याम भालाधरे वय 24 वर्षे राहणार - सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड, गोंदिया  यास बनावटी लोखंडी नोकदार चाकूसह ताब्यात घेण्यात आले.



 नमूद दोन्ही आरोपी यांचेविरुद्ध अवैधशस्त्र बाळगण्या बद्दल कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 135 म.पो.का. कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करून पो.ठाणे गोंदिया ग्रामीण व रामनगर येथे वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत..पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया गोंदिया ग्रामीण व रामनगर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई माननीय वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा श्री. दिनेश लबडे, तसेच पो. ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बोरकुटे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व पो. ठाणे रामनगर चे पोलीस पथक यांनी कारवाई केलेली आहे...

Tags

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)