संजय राठोड यांच्याजवळ 75 हजार मतदानाचा गठ्ठा मत असल्यामुळे शंभरच्या स्पीड मध्ये संजय राठोड यांची धाव मोठी असणार आहे त्यामुळे माणिकराव ठाकरे त्यांना हात लावण्याकरिता मोठी झेप घ्यावा लागणार आहे. परंतु तिसरा गडी तिसरा राज.म्हणजे अपक्ष उमेदवार दिनेश सुकोडे यांना मतदारांनी लाईक केले तर निश्चितच कोणत्या उमेदवाराचा बळी घेणार हे आज सांगता येणार नाही.
दिग्रस दारव्हा नेर मतदार संघासाठी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार दिनेश सुकोडे हे काँग्रेस पक्षातून बाद होणारे अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र दुहेरी होण्या ऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तुळल्या जात आहे. दिनेश सुकोडे यांनी कोरोना काळात अनेक प्रकारचे सामान्य जनतेला सहकार्य केले त्यामुळे कोण्या उमेदवाराचे पारड जड राहील हे आजच्या स्थितीत सांगता येणार नाही.महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय राठोड हे आपल्या समर्थकासह संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे. त्याबरोबरच भारतीय काँग्रेस पक्षाचे चे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकरावजी ठाकरे हे सुद्धा आपल्या हजारो समर्थकासह मतदारसंघांमध्ये संपूर्ण मतदारांशी संवाद साधून त्यांची समजूत करून आपल्या बाजूने मतदान कसे वळतील याची पत्त्यावर पत्ते फेकत आहे. यामध्ये असे निदर्शनात येत आहे की.संजय राठोड हे 25 वर्षापासून सतत दिग्रस विधानसभेचा गड आपल्या ताब्यात राखून बसलेले आता कायम ठेवणार का? किंवा त्यांच्या हातातून सुटणार हे मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. माणिकराव ठाकरे यांनी जर विजय मिळवला तर. निश्चितच दिग्रस विधानसभेचा चा गड कायमचा श्वास घेणार आहे. कारण माणिकरावजी ठाकरे यांचा विजय म्हणजे कुणबी आणि मराठा समाजाची अस्तित्वाची लढाई असे दिसून येत आहे. कारण संजय राठोड यांनी कुणबी मराठा समाजांना सत्तेपासून हद्दपार करून मराठा कुणबी समाजाचा अस्तित्व नष्ट करण्यात आले अशी मराठा समाजाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. संजय राठोड यांनी अनेक विकास कामे केल्यामुळे प्रत्येक समाजाच्या मतदारावर त्यांचा मत मागण्याचा अधिकार गाजवत आहे.
परंतु मुस्लिम समाज संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करीत आहे. कारण त्यांच्या धर्माच्या हुजूर बद्दल रामगिरी महाराजांनी चुकीचे उद्गार काढून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखल्या आहे त्याबद्दल मुस्लिम मतदान संजय राठोड यांना मिळणे कठीण झाले आहे. या शब्दाचा बदला म्हणून मुस्लिम समाज यावेळेस संजय राठोड यांच्याकडे पाठ फिरवणार आहे असे समजते. व मतदार मध्ये माणिकराव ठाकरे यांना वाढता पाठिंबा दिसत असून मतदारांमध्ये शर्ती लागले आहे. यामुळे माणिकराव ठाकरे. किंवा. संजय राठोड का दिनेश सुकोडे या तीन उमेदवारांपैकी कोण बाजी मारेल याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे