कित्येक आले,अन् गेले..पुराम साहेब.!प्रचाराचा श्रीगणेशा.."याच"गावातून करा.!

Shabd Sandesh
0
कोसबी/बू.गाव"अच्छे दिनाच्या"प्रतीक्षेत..
 संदेश मेश्राम देवरी, दि.०४ नोव्हे.
         महाराष्ट्र राज्य २०२४ विधानसभेच्या रणसंग्राम सुरू झाला असून,अनुसूचित जमाती आरक्षित असलेले आमगाव देवरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे राजकुमार पुराम तर, महायुतीकडून संजय पुराम तसेच अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे.
    याच मतदारसंघामधून वेगवेगळ्या पक्षाचे अनेक आमदार,खासदार आज पर्यंत झाले. परंतु, देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत गडेगाव अंतर्गत कोसबी/बू. या गावाकडे अजूनही एकाही जनप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. ही मोठी शोकांकिता आहे. कोसबी/बु. हे गाव महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगत आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये वसलेले असून,७० ते ७५ घरांची वस्ती आहे.९५ % आदिवासी जमात तर ५% टक्के इतर जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या मुख्य व्यवसाय शेती असून,उदरनिर्वाह करण्यासाठी कामाच्या शोधात पर जिल्ह्यात,राज्यात पलायन करत असतात. भारताने अलीकडेच स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण केले असून, या गावाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पक्के रस्ते नाही, गावात दिवाबत्तीची सोय नाही. एवढेच नव्हे तर या गावांमध्ये शिक्षणाची सोय नसून, प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत येथील विद्यार्थ्यांना बाहेरच धाव घ्यावी लागते. तसेच गेल्या पाच वर्षापासून प्रवाशांना ने - आण करणारी बसची सोय सुद्धा 
    कोसंबी/बु.गाव तालुका देवरी अंतर्गत आमगाव देवरी मतदार संघात येत असून,सदर गाव आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडते.अपुऱ्या सोयी सुविधा असलेल्या सदर गावाला सोयी सुविधा पूर्ण करण्याचे प्रयत्न आज पर्यंत झालेल्या एकाही आमदार, खासदाराने केले नाही. असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे फक्त निवडणुकीच्या वेळेस गावाला भेट देतात. मात्र वेळ निघाली की,पाच वर्ष कोणीही जनप्रतिनिधी या गावाकडे साधं ढुंकून पाहत नाही. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.म्हणून कोसबी/बु. वाशीयांनी होणाऱ्या भावी आमदारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात "याच" गावावरून करा. असे आवाहन केले आहे.
       जनप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष..
कोसबी/बु.गाव तालुका देवरी अंतर्गत आमगाव देवरी मतदार संघात येत असून,सदर गाव आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडते.अपुऱ्या सोयी सुविधा असलेल्या सदर गावाला सोयी सुविधा पूर्ण करण्याचे प्रयत्न आज पर्यंत झालेल्या एकाही आमदार, खासदाराने केले नाही. असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे फक्त निवडणुकीच्या वेळेस गावाला भेट देतात. मात्र वेळ निघाली की,पाच वर्ष कोणीही जनप्रतिनिधी या गावाकडे साधं ढुंकून पाहत नाही. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.म्हणून कोसबी/बु. वाशीयांनी होणाऱ्या भावी आमदारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात "याच" गावावरून करा. असे आवाहन केले आहे.
    प्रतिक्रिया
        सुरुवातीला सुरू असलेली साकोली ते मेहताखेडा काही कारणास्तव बंद करण्यात आली. मेहताखेडा मार्गावर नागरिकांना ये जा करण्याकरिता बसची व्यवस्था नसल्यामुळे, साकोली आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोसबी गावाला जि.प.शाळेची व्यवस्था,तसेच पिण्याची पाण्याच्या व्यवस्थेकरिता प्रशासन तसेच जनप्रतिनिधी यांच्या निदर्शनात सदर बाब आणून दिली आहे.तरीपण ग्रामपंचायत प्रशासनाअंतर्गत सदर गावाला सोय सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
    :- संगीता कुंभरे सरपंच ग्रामपंचायत  गडेगांव

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)