आमगाव विधानसभा मतदार संघात आज पासून प्रचाराला वेग

Shabd Sandesh
0
महायुती व महाविकास आघाडी मध्ये बंडखोरीमुळे विजयाचे गणित बिघडणार
   देवरी, दि.०५
          विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला खऱ्या अर्थाने आज मंगळवारपासून सुरूवात झाली असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारीख ४ नोव्हेंबरपासून महायुती व महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे विजयाचे गणित बिघडणार आहे. आता प्रचाराला १४ दिवसांचा अवधी मिळणार आहे.
विधानसभा निवडणूक महायुती विरुध्द महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार वशिवसेना शिंदे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व उबाठा शिवसेना पक्षाचे कोणकोणते नेते, पुढारी आमगाव - देवरी मतदार संघात प्रचारासाठी येणार आहेत, हे या १४ दिवसात पाहावयास मिळणार आहे. तसेच दोन आठवड्याच्या कालावधीत
उमेदवाराला मतदारसंघातील गावागावात
पोहचवावे लागणार आहे.
                 यामुळे सर्व पक्षीय उमेदवाराना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. नेत्यांची प्रचार सभा आणि रॅलीचे वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे. या कालावधीसाठी फक्त दोनच रविवार मिळणार आहे. त्यामुळे मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुक आली आहे. दिवाळीत थोडी फार थंडावलेली निवडणूक आता भाऊबीज नंतर उमेदवार निश्चित ठरल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)