आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया ९ नोव्हेंबरला

Shabd Sandesh
0
देवरी : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 साठी आमगाव विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व तयारी सुरू केली असून, मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला योग्यरित्या पार पाडण्यासाठी विविध स्तरावर यंत्रणा सज्ज आहे.
    दुसरी सरमिसळ प्रक्रिया : ६६-आमगाव (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे नियम पाळत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (मॉक पोलिंग) प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील आणि निवडणूक लढणारे उमेदवार तसेच त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही यात उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
     उद्दिष्ट व महत्त्व  : इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) द्वितीय सरमिसळ प्रक्रियेचा उद्देश म्हणजे मतदारांना निकोप, पारदर्शक व सुरक्षित मतदानाची खात्री देणे होय. ही प्रक्रिया निवडणूक यंत्रांच्या सुरक्षा, त्यांची कार्यक्षमता आणि कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी नागरिकांना शांतता व सहकार्याचे आवाहन केले आहे.
     निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, सर्व यंत्रणांची तपासणी व अधिकृत उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही वेळ निश्चित केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)