भाऊसाहेब.."पुराम" निपटला जी.?

Shabd Sandesh
0
६६-आमगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेला आलं उधान...

       संदेश मेश्राम देवरी, दि.०६

     ६६-आमगाव देवरी मतदार संघात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवाराने आपल्या शक्तीनुसार आज पासून प्रचार कार्याला सुरुवात केली आहे.सदर मतदार संघामध्ये मुख्य लढत महायुतीचे उमेदवार संजय पुराम तर, महाआघाडीचे उमेदवार राजकुमार पुराम या दोघांमध्येच पाहायला मिळणार आहे.
    परंतु, लक्षवेधीनुसार पक्षातून काही उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याकरिता सज्ज झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत व आता विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षांतील कार्यकर्त्यांना नजर अंदाज करीत असल्याचे आरोप शरदचंद्र पवार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकुमार पुराम यांवर सर्रास केला आहे. विलास पंढरी चाकाटे शरदचंद्र पवार गटातील मुख्य कार्यकर्ता असून,आम्ही सदैव शरद पवार साहेबांसोबत असून, विलास चाकाटे यांना या विधानसभा निवडणुकीत सहकार्य करणार आहोत. असा सोशल मीडियावर शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांचे संदेश वायरल झाल्यामुळे, महाविकास आघाडी यातूनच शरदचंद्र पवार पक्षातून नामांकन दाखल केलेले विलास पंढरीच्या चाकाटे यांनी अपक्षातून काँग्रेस उमेदवार राजकुमार पुराम यांना सडेतोड उत्तर देण्याचे कार्य हाती घेतले आहेत.
    तसेच महायुती अंतर्गत भाजप पक्षाकडून उमेदवारी दाखल झालेल्या संजय पुराम यांना समोरासमोर टक्कर देण्यासाठी भाजपचे उमेदवार शंकरलाल मडावी यांनी बंड करून अपक्ष लढण्याचे सामर्थ दाखविले आहे. याकरिता महायुतीतून लढणारे संजय पुराम यांची अधिकच डोकेदुखी वाढवलेली आहे.
    यातूनच आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मुखाद्वारे वेगवेगळ्या चर्चेला उधान आलेला आहे. "भाऊसाहेब.. "पुराम" निपटला जी.? असे वक्तव्य मतदार संघात कानाकोपऱ्यात घुमत आहे.
               पुराम.! विरुद्ध.. पुराम.!
संजय पुराम यांना अनुभवासमोर नवखा राजकारणाचे अनुभव नसलेले राजकुमार पुराम यांच्या कितपत टिकाव लागेल.यांची खरी कसोटी लागणार आहे.तर, एकीकडे सत्ता परिवर्तनचे वारे वाहू लागल्याने संजय पुराम नवख्या उमेदवारासमोर टिकाव धरू शकणार की नाही. अशी चर्चा मतदार संघात जोर धरू लागली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)