मतदारांनो.!मतदान करा,तेही लोकशाहीनेच...

Shabd Sandesh
0
किशोर कांबळे तालुका प्रतिनिधी दिग्रस,दि.०३
          लोकशाही म्हणजे काय? मतदारांनी आपल्या मताच्या माध्यमातून मतदानाचा हक्क अधिकार बजावत असताना तो कशा पद्धतीचा उमेदवार आहे तो उमेदवार आपल्या समस्या सभागृहात मांडतो का.जो उमेदवार आपल्या समस्या मानतो तोच खरा उमेदवार म्हणजे जनप्रतिनिधी. कारण त्यालाच म्हणल्या जाते खरी लोकशाही कारण रस्त्याने जाणारा भिकारी त्याला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार आहे. आणि या देशातल्या करोडपती,अब्जोपती त्यांना सुद्धा. एकच मतदान देण्याचा अधिकार आहे.तोच आहे.खरी लोकशाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्यामुळेच राज्यकर्ते आपल्या दारोदारी येऊन हात जोडून आपल्या मूल्यवान मताचे भीक मागतात.
        आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण धनवान आहो. एका मताचे मूल्य म्हणजे त्या येणाऱ्या उमेदवारांनी आपले आयुष्यभर पाय धुऊन पाणी पिले तरी त्या मूल्यवान मताची परतफेड होऊ शकत नाही. मग आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी ताकद दिल्यानंतरही आपण त्यांचे गुलाम का? व एखाद्या पक्षाची एक हाती सत्ता असली तर त्यांची हुकूमशाही निश्चितच चालतो. त्यांची हुकूमशाही बंद पडण्याची आपल्या एका मताचे ताकतीचे भरोशावर बंद पाडू शकतो. तोच आहे आपल्या सर्वांची लोकशाही. आशा सुंदर नटलेल्या लोकशाहीला गालबोट नाही लागली पाहिजे याकरिता सर्व भारतीय मतदारांनी काळजीपूर्वक विचार करून आपले मूल्यवान मतदान निस्वार्थपणे मताच्या रूपात दान करावं आणि लोकशाहीला खरोखर जिवंत ठेवावं. आपल्या मताची विक्री करणाऱ्या समाजाच्या ठेकेदारांना धडा शिकवा. तीच आहे खरी स्वाभिमानी भारतीय लोकशाही..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)