आमगाव विधानसभा मतदारसंघाचे तालुका अध्यक्ष विलास चाकाटे यांच्यासह तीन जणांची शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. शरदचंद्र पवार पक्षाने एक पत्रक पाठवून याची माहिती दिली.
जाहीर केलेल्या पत्रकानुसार, विलास चाकाटे, लता बारसे,सुरज खरोले,नीता साखरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बजरंगसिंह परिहार निरीक्षक गोंदिया जिल्हा यांच्या निर्देशानुसार, पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.