शेती संबंधित; ग्राम भडंगा येथील मोठ्या भावाने लहान भावाला केला जखमी
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोरेगाव, दि.२५ डिसेंबर २०२४
आपल्या वहिनी सोबत शेती संदर्भात बोलत असलेल्या लहान भावाची वाद उपस्थित करून फरशीने वार करण्यात केला. यात लहान भाऊ रक्तबंबाळ झाला. ही घटना गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे शनिवारी (दि.२१)घडली.
गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथील तिलकचंद लोला बावणे(४२) हा शनिवारी आपल्या वहिनी सोबत शेती बद्दल बोलत होता. दरम्यान त्याचा मोठ्या भाऊ प्रेमलाल लोला बावणे(५३) हा घराबाहेर आला तू शेती बद्दल एक शब्द बोलू नको. त्या संदर्भात बोलला तर तुला जीवानिशी ठार करेल असे म्हणत घरात गेला. काही वेळाने हातात फरशी घेऊन परत आला. त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने तीलकचंदवर वार केला. वार चुकविण्याच्या प्रयत्नात फरशी हाताला लागल्याने हात कपून रक्तस्त्राव झाला. वैद्यकीय अहवाल आणि तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी मोठा भाऊ प्रेमलाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार धारणे करत आहेत.