संबोधी पंचशील मंडळ पिटेेसुर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Shabd Sandesh
0
तुमसर प्रतिनिधी, दि.२६ जाने
शब्द संदेश न्यूज नेटवर्क, 
तुमसर तालुक्यातील पिटेसुर येथील संबोधी पंचशील मंडळ, येथे 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.

26 जानेवारीच्या दिवशी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य आणि अधिकाराची आठवण करून दिली जाते. आजच्या दिवशी आपल्या देशाला संविधान प्राप्त झाले, ज्याने देशाला स्वतंत्र कायदे आणि अधिकार दिले. या दिवशी आपण आपल्या देशातील शहीदांना अभिवादनही केले जाते आणि एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
आपल्या संविधानात असलेल्या स्वाभिमानाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आपल्या देशाचा नागरिक म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. 76 व्या गणराज्य दिनाच्या या पवित्र दिवशी, आपल्या सर्वांना या महान देशाचे गौरवशाली संविधान आणि त्याने दिलेल्या अधिकारांची आठवण ठेवून, देशाच्या प्रगतीसाठी काम करायला प्रेरित होऊया.प्रजासत्ताक दिन हा फक्त स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर एकता, बंधुता आणि सामूहिक कर्तव्यांचं प्रतिक आहे. या दिवशी आम्ही सर्व देशवासीय एकत्र येऊन आपल्या देशाच्या भविष्यासाठी वचनबद्ध होतो.म्हणून हा दिवस भारतातील सर्व नागरिक एकत्रित येऊन, एकोप्याने मोठ्या उत्साहाने,आनंदाने साजरा करतात.भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व संबोधी पंचशील मंडळाचे अध्यक्ष यांनी समजावून सांगितले.

डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि सरपंच गुरुदेव भोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित मान्यवर संबोधी पंचशील मंडळातील पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र देशभ्रतार, उपाध्यक्ष योगीराज लांजेवार, कोषाध्यक्ष संजोग खोब्रागडे,आणि मंडळातील सर्व सदस्य.त्याच बरोबर पोलिस पाटील पिटेसुर करूनाताई उके, तुमसर पंचायत समिती सदस्य सलोनिताई भोंडे,ग्रा.पं.पिटेसुर सदस्य गणेशजी तांडेकर, सामाजिक कार्यकर्ते उमेशभाऊ बिंजेवार, माजी सरपंच ग्रा. पं.पिटेसुर कल्पनाताई रामटेके, तसेच जि.प. शाळा पिटेसुर मुख्याध्यापक श्री.धावले सर, श्री.शामकुवर सर,श्री उके सर, कुरेशी सर, त्याचबरोबर इंदुताई मेमो. हायस्कूल पिटेसुर मुख्याध्यापक श्री. दहीवले सर, श्री.ठाकरे सर, श्री.भवते सर तसेच शाळेतील विद्यार्थी,तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आरोग्य सेवक श्री.बावनकुळे साहेब, सोनवाणे बाई,संगीता लांजेवार,ग्राम. पं.कर्मचारी सुजाता कळंबे,उदेभान लांजेवार,विशाखा तिरपुडे,मंगला गौपाले,तसेच परिसरातून आलेले नागरिक गण यांनी संबोधी पंचशील मंडळ येथे उपस्थिती दर्शवली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)