सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी जंगल परिसरात सुरू होता जुगाराचा डाव
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.२९ जानेवारी २०२५
जंगल शिवारात तासपत्ते कुटत बसलेल्या आठ जुगारांना पोलिसांनी धाड घालून रंगेहाथ पकडले. देवरी पोलीस ठाणे अंतर्गत पुतळी जंगल शिवारात शनिवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या कार्यात एकूण २ लाख ५१ हजार ३०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
पुतळी जंगलात काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड घातली असता, त्यात आशिष वसंत बडोले (२४), मनीष तरोणे (२३),रजनीकांत गणेश वालदे (३९) रा.कोयलारी, अनुप मोरेश्वर बडोले (२९) रा.कोयलारी, मिथुन नीलकंठ वालदे (३५),सत्यपाल राजेंद्र शहारे(३६) धर्मेंद्र वसंत साखरे (४९) रा. कोयलारी व प्रकाश शंकर गायकवाड(३६) रा. पुतळी हे जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पोलीस नायक संतोष समरीत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मजुका कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे .
*एवढा माल केला जप्त* घटनास्थळावरून पोलिसांनी फळावर १३०० रुपये रोख, ५२ तासपत्ते, पिवळ्या रंगाची त्रिपाल, आरोपीकडून रोख ११००० हजार रुपये, सात मोबाईल तसेच सहा दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
