शब्द संदेश न्यूज नेटवर्क,
देवरी,दि. 2 जानेवारी 2025
नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर दि.०१ जानेवारी २०२५ मौजा चिचगड येथे मग्ररोहयो अंतर्गत (वीस लाख रुपये) नवीन सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन यांच्या हस्ते पार पडले.
त्याप्रसंगी विजयजी कश्यप उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,राधिकाताई धरमगुडे जिल्हा सदस्य गोंदिया, चिचगड ग्रामपंचायतच्या सरपंच भाग्यश्री भोयर, द्वारकाप्रसाद धरमगुडे उपसरपंच, तुलसी सलामे ग्रामपंचायत सदस्य, निशाताई परिहार ग्रामपंचायत सदस्य, गीता ताई भोयर ग्रामपंचायत सदस्य,साईन सय्यद ग्रामपंचायत सदस्य,अरविंद परिहार सामाजिक कार्यकर्ता, शितल परीहार सामाजिक कार्यकर्ता,माजी सरपंच कल्पनाताई गोसावी,रोजगार सेवक परिहार,व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.