व्ही. कौसल्यायन महिला महाविद्यालय देवरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Shabd Sandesh
0
देवरी शब्दसंदेश न्यूज नेटवर्क 
दिनांक 27 जानेवारी 2025

         आश्रय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था द्वारा संचालित व्ही. कौसल्यायन महिला महाविद्यालय (गृह विज्ञान) विभाग येथे प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिन दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:१५ वाजता ध्वजारोहण समारंभ वैभव जैन अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती व्ही. कौसल्यायन महिला महाविद्यालय देवरी यांच्या शुभहस्ते तसेच चरणदास उंदीरवाडे अध्यक्ष महिला महाविद्यालय यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. 
कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या फोटोचे माल्यारपण करून व त्यानंतर ध्वजारोहन करून राष्ट्रगीत म्हणून करण्यात आले. कार्यक्रमाला अशोक जैन सामाजिक कार्यकर्ता देवरी, मधु साखरे,अर्शद शेख, आर.पी. बडोले, रूपचंद जांभुळकर, मधु शहारे,अजय पोंगळे,अग्रवाल मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयाचे विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु.शिल्पा राऊत यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)