रेती तस्करांना पोलिसांचा दणका; ९ ब्रास रेतीसह ट्रक जप्त

Shabd Sandesh
0
महामार्गावरील मुरदोली परिसरातील अवैध रेती वाहनावर  देवरी पोलिसांची कारवाई..
     देवरी, दि.२६ जानेवारी २०२५
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क 
        देवरी शहराला लागुन असलेल्या छत्तीसगड राज्यातुन देवरी तालुक्यातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाने मोठय़ा प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत आहे.अशा गोपनीय माहितीनुसार,देवरी पोलीसांनी रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मुरदोली परिसरात सापळा लावून रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक क्र.एम.एच.४९ ए.टी.७५६६ ला आज दि.२६ जानेवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास तपासनी दरम्यान सदर ताब्यात घेतला आहे. 
    सदर ट्रक ताब्यात घेत वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या रेती तस्कारांचे धाबे दणाणले आहेत. देवरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाही करण्यात आली. 
    सुत्रानीं दिलेल्या माहतीच्या आधारावर  देवरी पोलिसांनी अडवलेला ट्रक तपासनी केला असता, या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाकडे महाराष्ट्रात रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले आहे. देवरी पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकांकडे महाराष्ट्र शासनाची स्वामित्वधन (रॉयल्टी) पावती नव्हती. या चालकांकडे पोलिसांनी  अधिक चौकशी केली असता छत्तीसगड राज्यातील धमतरी येथून ही रेती आणल्याचे चालकांनी सांगितले. त्यांच्याकडे रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याने ट्रक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. या ट्रक वाहनात ९ ब्रास रेती असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात वाहन,वाहन चालक व वाहनात असलेली अवैध रेती पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहे. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)