मुंबई-गोवा महामार्गावर खांब नजीक कारची ट्रेलरला धडक; एक ठार तीन गंभीर

Shabd Sandesh
0
मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी (दि.२३) रात्री दीडच्या सुमारास खांब हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर कार उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकली. या अपघातात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
   या अपघातात आदित्य दिपू वर्मा (वय ३८ रा. कमलादेवी कॉलेज हेरीटेल, ठाणे) हे ठार झाले. तर निलेश राधानी (वय २५ रा.कल्याण), सिद्धेश योगेश शिंदे (वय २६ खडकपाडा, कल्याण वेस्ट) तसेच फिर्यादी अमित विजय करपे (रा. खडकपाडा कल्याण वेस्ट) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. 
  याबाबत कोलाड पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अमित विजय करपे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री दीडच्या सुमारास सिद्धेश योगेश शिंदे हे एम.एच. ०५ ई.ए.२५०५ कारणे चिपळूण ते कल्याण प्रवास करत होते. मौजे खांब गावच्या हद्दीत येताच एचपी पेट्रोल पंप समोर उभा असलेल्या ट्रेलर (एम एच ४६ बी यु ४०१४) ला मागेहून धडकले.
  या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते ताफ्यासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अपघात ग्रस्तांना स्थानिक रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मदत केली. कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोसई गायकवाड करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)