नागपूर येथे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नागपूर, दि.२७: मे महिन्यात देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाची, देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच न्या. भूषण गवई आज शुक्रवारपासून तीन दिवस विविध कार्यक्रम निमित्ताने नागपुरात आहेत. नागपूर, अमरावती पर्यायाने विदर्भाशी त्यांचे जवळचे नाते असल्याने या दौऱ्यात अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ ला येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या. गवई यांच्या हस्ते शनिवार २८ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)