शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.21 : महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दि. 29 ते 31 जुलै 2025 या कालावधीत गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सदर समितीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता शसकीय विश्रामगृह गोंदिया येथे एकत्र जमणे. सकाळी 9.30 ते 10 पर्यंत शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे समितीची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत अनूसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व अडचणीबाबत अनौपचारीक चर्चा. सकाळी 10 ते दुपारी 11.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील नगरपरिषद कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच शासकीय यंत्रणांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा,
सकाळी 11.30 ते दुपारी 12 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 12 ते 12.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गोंदिया परिमंडळ कार्यालयांतर्गत येत असलेल्या गोंदिया शहर व गोंदिया ग्रामीण या कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
दुपारी 12.30 ते 1 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गोंदिया कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 2 ते 3 पर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे जिल्हा परिषद कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच जिल्हा परिषद यंत्रणांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत जिल्हा परिषद गोंदिया येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा. त्यानंतर शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे मुक्काम.
30 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत केलेल्या कामांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
31 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समितीने जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा/वसतिगृह नजेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत कामांना दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात करावयाची कार्यवाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व पोलीस अधीक्षक या कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण व अनुशेष याबाबत झालेल्या बैठकीच्यावेळी उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक व चर्चा.