एफडीसीएम कॉलनीतील प्रकार
शब्दसंदेश न्यूज अहेरी, दि.१२: अहेरी नागेपल्ली येथील एफडीसीएम कॉलनीमध्ये १० जुलै रोजी वन्यप्राण्याच्या संभावित शिकारीचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणात वनविभागाने रेखा दिवाकर वनकर (५५), संजय गोविंदा कोटरंगे (२५), अनिल राजन्ना बोलेम (४०), भानय्या बुचय्या जंगीडवार (६२), अमोल गणपत ठाकरे (३५) या पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणात रेखा वनकर यांची चौकशी केली असता त्यांनी ते चितळाचे मांस असून सदर मांस संजय गोविंदा कोटरंगे यांच्याकडून मिळाल्याचे कबूल केले. कोटरंगे याने देखील उपविभागीय वनअधिकाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबूली दिली.
घटनास्थळी वन्यप्राण्याचे मांस आणिइतर साहित्य मिळाले. सर्व आरोपींना १० जुलै रोजी अहेरी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, आलापल्ली उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार, वनक्षेत्रपाल नारायण इंगळे, गौरव गणवीर, वनपाल सहारे, गोवर्धन, बुद्धावार, तुराणकर तसेच वनरक्षक राव व दहागावकर यांच्या पथकाने केली.