महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार उभारण्याकरिता विविध योजना

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज गोंदिया दि.21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणाऱ्या व्यक्तींची त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना व्यवसाय उभारण्याकरीता महामंडळाअंतर्गत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. खालीलप्रमाणे योजनेचे स्वरूप आहे.

अनुदान योजना - प्रकल्प मर्यादा रु. 50 हजार पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 50% अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते व कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बिजभांडवलयोजना- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मर्यादा रु. 50 हजार ते 5 लाखापर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20% बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4% द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु. 50 हजार चा समावेश आहे, प्रकल्प मयदिच्या 75% बँकेचे कर्ज देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो, महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफत्यानुसार 3 ते 5 वर्षांच्या आत करावी लागेल, अर्जदाराचा 5% स्वतःचा सहभाग भरावयाचा आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग आणि चांभार यांना सोडुन उर्वरीत प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ दिले जाते. महार, होलीया, बुरुड, मेहत्तर, खाटीक, घसीया इतर सर्व. व्यवसायाकरीता ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही रित्या अर्ज भरता येईल. इच्छुक लाभार्थ्यांनी त्वरीत अर्ज करावे. (ऑनलाईन साठी Navyug Beneficiary Register (nbrmahapreit.in) या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावे.) कार्यालयाचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, आमगाव रोड, गोंदिया- 441601, दुरध्वनी क्रमांक. 07182-232947.

उच्च शैक्षणिक योजना (NSFDC, ELS) एनएसएफडीसी योजनेअंतर्गत व्यवसायीक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशाअंतर्गत कर्ज मर्यादा रु.30 लक्ष पर्यंतचे प्रावधान आहे व देशाबाहेर कर्ज मर्यादा रु.40 लक्ष पर्यंतचे प्रावधान आहे. व्याज दर द.सा.द.शे. 6% व स्त्री लाभार्थी करीता द.सा.द.शे. 5.5% व्याज दर इतका आहे. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील वार्षिकद उत्पन्न मर्यादा रु. तीन लक्ष असणे आवश्यक आहे.

उच्च शैक्षणिक कर्ज (NSKFDC, ELS) ही योजना अनुसूचित जाती अंतर्गत असलेल्या सफाई कामगारांकरीता आहे. (उदा. मेहत्तर, घसीया.... इत्यादी) एनएसकेएफडीसी योजना अंतर्गत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशाअंतर्गत कर्ज मर्यादा रु. 10 लक्ष पर्यंतचे प्रावधान आहे व देशाबाहेर कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंतचे प्रावधान आहे. व्याज दर द.सा.द.शे. 6% व स्त्री लाभार्थी करीता द.सा.द.शे. 5.5% व्याज दर इतका आहे. सदर वरील NSFDC व NSKFDC योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे, त्याकरीता Navyug Beneficiary Register (nbrmahapreit.in) या संकेतस्थळावर जाऊन अर्जदारांनी आपले अर्ज दाखल करावे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)