युरियाचा तुटवडा; "लिंकिंग"च्या बेकायदेशीर अटीमुळे शोषण

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज भंडारा, दि.२९: खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताच्या टंचाईने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. धान लागवडीसाठी अत्यावश्यक असणारे युरिया मिळविण्यासाठी शेतकरी एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात धाव घेत आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी विक्रेते 'युरिया हवा असेल, तर डीएपी, एनपीके किंवा सूक्ष्म खतेही' घ्या अशी बेकायदेशीर अट घालत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च व आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे.
शासकीय दरात २६६ रुपयांना मिळणारी युरिया खताची बॅग आता टंचाईमुळे अनेक ठिकाणी ३०० ते ४०० रुपयांना विकली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच लिंकिंगच्या या बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना गरज नसलेल्या इतर खतांची जबरदस्तीने खरेदी करावी लागत आहे.

पिकांची वाढ, उत्पादनावर परिणामाची शक्यता

युरियाच्या तुटवड्यामुळे धान रोवणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अडचणी वाढल्या आहेत. खत वेळेवर न मिळाल्यास धान पिकाची वाढ खुंटण्याची व उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे..

कडक तपासणी व कठोर कारवाईची अभाव

खत नियमन आदेश, १९८५ प्रमाणे कोणतीही दुकान किंवा विक्रेता खतांसोबत दुसरे खत विकायला भाग पाडू शकत नाही. मात्र, प्रत्यक्षात कृषी विभागाकडून कडक तपासणी अथवा कारवाई होत नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. कठोर कारवाईची मागणी होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)