भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज 
बिहारची राजधानी पाटणा भाजप नेत्याच्या हत्येने हादरली. पाटणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र केवट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सुरेंद्र केवट यांच्यावर गोळीबार केला. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. गेल्या काही दिवसात बिहारमधील दुसरी खळबळजनक घटना आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झालेल्या बिहारमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोपाल खेमका यांच्या हत्येची घटना चर्चेत असतानाच पाटणामध्ये भाजप नेते सुरेंद्र केवट यांची हत्या करण्यात आली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)