कवलेवाडा येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळले

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि. 8 : तालुक्यातील मौजा कवलेवाडा येथे आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुष्पाबाई अमृतलाल पटले यांचे राहते घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)