अंत्यसंस्कारासाठी प्रेत थेट ग्रामपंचायत कार्यालयात

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज कारंजा/वाशिम, दि.१२: गावात स्मशानभूमी नसल्याने आणि अंत्यसंस्कारा वेळी पाऊस असल्याने ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क ग्राम पंचायत मध्ये नेल्याचा धक्कादायक प्रकार कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथे घडला. गावात स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार वेळी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशातच जुन्या स्मशानभूमीत मानवी वस्ती झाल्याने सोमठाणा येथे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाशी चर्चा करूनही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु अद्याप पर्यंत स्मशानभूमी बांधकामासाठी ग्रामपंचायतप्रशासनाने ठोस पावलेन उचलल्याने ग्रामस्थ संतप्त झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. बुधवारी ९ जुलै रोजी सोमठाणा येथील स्थानिक रहिवासी नंदकिशोर कटके यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आणि त्याच दिवशी संततधार पाऊस असल्याने

अंत्यसंस्कार कुठे करावे असा प्रश्न कटके यांच्या नातेवाईकांपुढे आणि ग्रामस्थांपुढे निर्माण झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्काराच्या साहित्यासह चक्क ग्राम पंचायत मध्ये नेऊन ठेवला. पाहता पाहता हा विषय पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला. त्यामुळे पोलिसांनी आणि

ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढली आणि संतप्त ग्रामस्थांना शांत केले. त्यामुळे कटके यांचेवर अखेर शेतात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाव परीसरात वन विभागाची जमीन असल्याने आतापर्यंत अंत्यसंस्कार हे उघडयावर केल्या जात होते. मात्र ज्या ठिकाणी जुनी स्मशानभूमी होती. त्या ठिकाणी राहण्याची वस्ती झाल्यामुळे अधिकृत जागा नसल्याने मृतकांच्या नातेवाईकांना उघडयावर अत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत ने पुढाकार घेउन त्वरीत स्मशानभूमी बांधावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थानी केली. 

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही उघड्यावर अंतिम संस्कार
 देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही स्माशनभूमी नसल्याने सोमठाणा गावात मृतदेहांना उघड्यावरच अग्नी द्यावा लागतो. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होतो. विशेष म्हणजेहा अंत्यसंस्कार करण्यासाठी शेतात जाताना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांवर कोणी स्मशानभूमीसाठी जागा देता का जागा? असे म्हणण्याची वेळ आली स्मशान आहे.

स्मशानभूमी बांधण्यासाठी प्रयत्न करणार सोमठाणा येथे गावालगत असलेल्या सर्वे नंबर १३ मध्ये ०.४० आर एवढी जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध आहे. त्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण केल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. निधी उपलब्ध झाल्यानंतर अतिक्रमण काढून स्मशानभूमी बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील.

विजया पाटील ग्रामसेवक सोमठाणा

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)