पत्नीनेच केली पतीची हत्या

Shabd Sandesh
0
 सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक प्रकार

प्रतिनिधी, सालेकसा शब्दसंदेश न्यूज, दि.०१

 दि. ३० जून २०२५ रोजी सुमारे ११.३० वाजता सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील हलबीटोला येथे एक धक्कादायक घटना घडली. राजकुमार फत्थू मेश्राम (वय ४८ वर्षे, व्यवसाय – मच्छी मारी, रा. हलबीटोला, ता. सालेकसा, जि. गोंदिया) याचा त्याच्या पत्नीनेच मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे.

सदर प्रकरणात आरोपी म्हणून रामकला राजकुमार मेश्राम (वय ३६ वर्षे) हिचे नाव समोर आले आहे. घटना दि. २९/०६/२०२५ रोजी  १९:३० वाजता घडली. मृतक राजकुमार याची पत्नी रामकला ही दररोज घरी दारू पिवून येतोस म्हणून आरडा  रोरड करत गोठ्यात असलेला लाकडी बासाचा मजबूत दांडा घेवून मारला व रात्री त्याला घरी येवू नदील्याने तथा योग्य ते उपचार न मिळाल्याने रात्रभर त्याच अवस्थेत पडून रहलयाने पतीचा मृत्यू झाला आहे. 
 नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर सालेकसा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस तपास सुरू:

सदर प्रकरणात 268/2025 कलम 105 भा. न्या. सं. 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पत्नी रामकला मेश्राम असून अटक करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सालेकसा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. भुषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास अधिकारी म्हणून स.पो.नि. किशोर मावस्कर काम पाहत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)