देवरी, दि.११
गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस ठाणे अंतर्गत डव्वा व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत नवरगाव कला येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही घटना ०९ नोव्हेंबरचे आहेत.डव्वा येथील घटनेतील मृत्तकाचे नाव मंगेश चैतराम दिहारी तर, नवरगाव कला येथील अशोक भैय्यालाल ठाकूर असे मृताचे नाव आहे. पोलीस ठाणे अंतर्गत डव्वा येथील हा युवक काही गेल्या काही दिवसापासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. मनोरुग्ण असल्याने तो कुठेही भटकत असे. ०९ नोव्हेंबरच्या सकाळी पाच वाजता सुमारास तो घराबाहेर निघाला. त्यातच दुपार दरम्यान एका झाडाला त्याचे मृतदेह फासावर टांगलेले आढळले. यामुळे त्याने आत्महत्या केल्या असल्याची बाब समोर आली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्याचप्रमाणे गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या नवलगाव कला येथील अशोक भैयालाल ठाकूर यांचे मृतदेह शेत शिवारातील झाडाला फासावर टांगलेले आढळले. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याची समोर आले. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.