मॉर्निंग वॉक ला गेलेल्या इसमावर काळाचा हल्ला; अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार

Shabd Sandesh
0
देवरी आमगाव मार्गावरील ग्राम भागीशिवारातील अत्यंत दुर्दैवी घटना
    संदेश मेश्राम देवरी, दि.११
देवरी आमगाव मुख्य मार्गावरील देवरी वरून अंदाजे २ की.मी.अंतरावर असलेल्या ग्राम भागी शिवारातील ग्रीन वूड नजिक मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.गजानन मोतीराम राऊत अंदाजे (वय ६४) रा. भागी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.आज पहाटे ४:०० वाजे च्या सुमारास घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
    सध्या देवरी आमगाव मार्गाचे दुपदरीकरण झाले असून, या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. यातूनच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
     नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गजानन राऊत आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. मॉर्निंग वॉक करत असताना, डॉ.चौरागडे यांच्या ग्रीन वूड नजिक अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यात गजानन चा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भागी गावावर शोककळा पसरली असून,गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.देवरी
 पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून, या रस्त्यावरुन गेलेल्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)