संदेश मेश्राम संपादक देवरी
एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नागरिकांच्या मूलभूत अधिकारासाठी रान पेटविणाऱ्या माझे देवरी परिवाराची चुप्पी मात्र फारच बोलकी ठरत आहे. शांत, स्वच्छ, सशक्त, संस्कृत देवरी साठी सातत्याने आग्रही असणाऱ्या देवरीच्या राजकीय समूहाने निवडणूक काळात पाळलेले मौन सर्वच उमेदवारांना मूलभूत प्रश्नावर बोलण्यास भाग पाडत आहे. यातच या परिवाराचे महत्त्व अधोरेखित होते.
गेल्या पंधरा वर्षापासून देवरीच्या सामाजिक क्षेत्रात प्रभावी आणि निर्णायक भूमिका घेत अनेक सामाजिक प्रश्नांची उकल करण्यात यशस्वी ठरलेला माझा देवरी परिवार हा राजकीय समूह दिशादर्शक ठरला आहे. पत्रकार, डॉक्टर, सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी,राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक अशा समाजातील सर्व क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या सक्रिय सहभाग असणारा परिवार. एक कुटुंब म्हणून प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी कर्तव्य बजावत असतात. माझ्या देवरी परिवारात चर्चिले जाणारे अनेक सामाजिक विषय प्रशासनाच्या मदतीने मार्गी लागतात. आज पर्यंत हजारो गरजू रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य परिवाराच्या माध्यमातून झाले आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष रुग्णांना केलेली मदत, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वाहतुकीचे नियम पाडावेत ,यासाठी महाविद्यालयीन युवक युवतीसाठी जनजागृती उपक्रम, संविधान उद्देशिकांचे मोफत वितरण, रक्तदान, वृक्ष लागवड चळवळीला गतिमान करण्यासाठी विविध उपक्रमाचे यशस्वी आयोजन करीत माझ्या देवरी परिवाराने नि:स्वार्थ सेवाभावाचे आदर्श उदाहरण ठेवले आहे.
दरम्यान,विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या.आणि आचारसंहितेच्या नावाखाली अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांना बगल देण्यात राजकारणी यशस्वी ठरले. अनेकदा व्यक्तिसापेक्ष किंवा प्रसंग सापेक्ष असतात. या तर्कातून निघालेल्या सार योग्यच असेल असे नाही. ही समय सुचकता सामाजिक भान माझ्या देवरी परिवाराच्या प्रत्येक मान्यवर सदस्यांच्या वर्तनातून स्पष्ट होत आहे. स्वयं सहनशीलता आणि संस्काराच्या शिदोरीवर लढलेला हा लढा माझ्या देवरी परिवाराला अनेक मूलभूत अधिकार मिळवून देईल. यात कसलीही शंका नाही.निदान या पुढील काळात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर जागरूक होतील का?असा सवाल देवरीवाशियांमध्ये घुमत आहे.