सर्प दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Shabd Sandesh
0
     अर्जुनी/मोर. दि.१४
      अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला विषारी सापाने चावा घेतल्याने त्याची मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. दौलत तानोजी शेंडे(७२)असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
    सध्या खरीप हंगामातील कापणी व मळणीची कामे सुरू आहे.त्या अनुषंगाने शेतकरी, शेतमजूर शेतात सकाळपासूनच शेतीची कामे करण्यासाठी जात असतात. त्यात १३ नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे केशोरी येथील शेतकरी दौलत तानोजी शेंडे हे शेतात गेले. दरम्यान, शेत काम करीत असताना त्याच्या पायाला अचानक एका विषारी सापाने चावा घेतला.दौलत शेंडे हा कसाबसा घरी पोहोचला. लगेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसात दाखल करण्यात आली. तसेच पोलीस अधिकारी भोसले यांनी चौकशी करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केले. दौलत शेंडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे. मात्र या घटनेमुळे केशोरीसह परिसरातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)