मुरदोली येथील जाहीर सभेत मतदारांना आवाहन
देवरी, दि.१४
दि.१३ नोव्हेंबर २०२४ ला ग्राम मुरदोली येथे महाविकास आघाडी तर्फे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत जिथे प्रामाणिक पणे काम करूनही विश्वास ठेवत नाहीत तेथे थांबणे चुकीचे.भारतीय जनता पक्षाचे सहा वर्ष अगदी प्रामाणिकपणे काम करूनही उलट अविश्वास दाखविला. कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. राज्यातील घाणेरडी राजकारण संपुष्टात आले पाहिजे. याकरिता दूर दृष्टी व पूर्ण ग्रामीण विचाराचे नेते राजकुमार पुराम साहेब यांचे नेतृत्व बळकट करण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करीत आमगाव विधानसभा मतदारसंघातील सुजान मतदार बांधवांनी राजकुमार पुराम यांना विजयी करण्यासाठी आवाहन रा.का.शरद पवार महिला अध्यक्ष आरती जांगले यांनी केले आहे.
यावेळी,पूर्णचंद्र पाढी महासचिव भारतीय युवा कांग्रेस,आसाम आमदार तिडके,पर्यवेक्षक प्रदीप मान,संदीप भाटिया जी.प.सदस्य गोंदिया,सुनंदा बहेकार,अरुण आचले,हुकरे सर,राजू चांदेवार,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच गावातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.