मामाच्या गावी दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Shabd Sandesh
0
              बोंडगाव सुरबन येथे शोककळा..
अर्जुनी/मोर. दि.१२
    अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथील राजेंद्र वाढवे यांच्या कुटुंबातील मुलगा मुलगी हे दोन्ही चिमुकले दिवाळी सणाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खडकी या गावी गेले होते. १० नोव्हेंबरला वाढवे कुटुंबातील दोन्ही चिमुकल्यांच्या खडकी या गावात शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी व हृदयाला पाझर आणणाऱ्या घटनेमुळे बोंडगाव सूरबन या गावात एकच शोककळा पसरली. दोन्ही चिमुकल्यांचा पार्थिव गावात येताच, गावातीलच नव्हे तर परिसरातील आप्तेष्टीठानचे डोळे पाणावले. दिव्यांनी राजेंद्र वाढवे (१४) प्रेम राजेंद्र वाढवे(१०) अशा मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.     
     सविस्तर असे की, बोंडगाव सुरबन येथील राजेंद्र वाढवे हे मोल मजुरी करून कुटुंबाचे उद्धरनिर्वाह करतात. यांच्या कुटुंबात मोठी मुलगी दिव्यांनी व लहान मुलगा प्रेम असे दोन चिमुकले होते. शाळेला दिवाळीची सुट्टी असल्यामुळे, दोन्ही मुले मामाच्या गावी गेले होते. त्यातच काल भंडारा जिल्ह्यातील खडकी येथे दुर्दैवी घटना घडली. आणि वाढवे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. दोन्ही चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बोंडगाव सूरबन सहित परिसरात एकच शोककळा पसरली. दोन्ही चिमुकल्यांच्या पार्थिव गावात पोहोचतात गावातीलच नव्हेतर, परिसरातील लहान मोठ्यांना अश्रू आवरता आले नाही.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)