एका आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने,उमेदवारांच्या प्रचारांना वेग!

Shabd Sandesh
0
महाविकास आघाडीचे उमेदवार राजकुमार पुराम व महायुतीचे संजय पुराम यांच्यात सरळ लढत; अपक्षांची मते कुणाच्या पथ्यावर??
देवरी, दि.१३
आमगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात व राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मतदान अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपले असून, येणाऱ्या पुढच्या बुधवारी म्हणजेच २० तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराला वेग आलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत. राजकुमार पुराम यांच्या प्रचाराची धुरा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सांभाळलेली आहे. दुसरीकडे आमगाव विधानसभेत महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या होम टू होम प्रचारावर भर दिसून येत आहे. घर चलो अभियान यानुसार प्रत्येक घराघरात ते पोहोचत आहेत.मतदार त्यांना प्रतिसाद देत आहेत तर तिसरीकडे अपक्ष आघाडीचे उमेदवार यांनी पण प्रचारात मुसंडी मारलेली असून,घराघरात जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. 
    मतदार ज्याला मतदान करायचे त्यालाच करतो.मात्र आव्हान करणे हे उमेदवाराचे काम असते.आणि ते काम ते प्रामाणिकपणे करीत आहेत. यातच,अपक्षांना पडणारी मते कुणाच्या? पथ्यावर पडतात. व कुणाला फायदा होईल हे तर येणारा काळच ठरवेल. वर्तमान काळातील जातिपातीचे राजकारण सुरू असून,यामुळे राजकारण दूषित झाले आहे. मतांसाठी ठराविक समाजाचे लागूनचालन करणे, जाती जातीत द्वेष पसरविणे हेही प्रकार राजकारणात सुरूच असतात. एवढे मात्रे खरे..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)