"मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी महिलांना खटाखट 3000 देऊ"- राहुल गांधी

Shabd Sandesh
0
गोंदिया, दि.१३
    पंतप्रधान मोदींनी संविधान वाचलेच नाही. उद्योगपतींना सोडा लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदीनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का? केली नाही. अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. मवीआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट 3000 देऊ,राहुल गांधीची गॅरंटी शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते, असे दावे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असतात. पण ते काळे कायदे शेतकऱ्याच्या हिताचे होते, तर शेतकरी कशासाठी रस्त्यावर उतरले होते?.भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या धान,कापूस, सोयाबीन यांना आधारभूत किंमत देत नाही. देशातील काही उद्योगपतींचे सोळा लाख कोटीचे कर्ज माफ केले परंतु, येत्या अकरा वर्षांमध्ये एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही? मोदी हे अडाणी-अंबानीचे आहेत. ते लग्नात गेले पण, मी गेलो नाही कारण मी तुमच्या आहे. असे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ काल दि.११ नोव्हेंबर २०२४ ला गोंदिया येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत राहुल गांधीने भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)यांच्यावर हल्लाबोल केला.
   पंतप्रधान मोदी स्वतःला ओबीसी सांगत असतात. आणि त्याच ओबीसीच्या सातत्याने अपमान करीत असतात. ओबीसी समाजाची लोकसंख्या 50% असताना मोदी सरकार त्यांच्यावर फक्त पाच टक्के खर्च करते हा खरा ओबीसी समाजाचा अपमान आहे म्हणून जास्त निहाय जनगणना करण्याचा काँग्रेसच्या निर्धार आहे तसेच आरक्षणावरील 50% मर्यादा हटविण्याचा प्रयत्न आहे असा निर्धार राहुल गांधी यांनी बोलून दाखविला. 
    देशाच्या संविधानात हजारो वर्षापासूनचे विचार आहेत. भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. संतांचे विचार आहेत. या संविधानात समांतर प्रेम, सर्वधर्माच्या आदर आहे. पण हे लाल रंगाचे संविधान दाखवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, गरीब शेतकरी यांच्यावर अन्याय, अत्याचार करावे असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान मोदींनी देशाचे संविधान वाचलेच नाही. भाजप,आरएसएस व नरेंद्र मोदी २४ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर हल्ले करून ते संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आणि काँग्रेस मात्र या संविधानाच्या आरक्षणासाठी लढत आहे. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 
दरम्यान काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसगड मध्ये धानाला तीन हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता केली आहे. कर्नाटकामध्ये महिलांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे. महालक्ष्मी योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात मावीआचे सरकार आल्यास दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये खटाखट खटाखट जमा केले जातील. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस,धानाला बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करू. २५ लाखाचा आरोग्य विमा तरुणांना ४००० च्या भत्ता व अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करू असे आश्वासन देत, नरेंद्र मोदी मुठभर अरबपतींना जेवढे पैसे देतील तेवढे पैसे काँग्रेस सरकार गरिबांना देईल असा शब्द राहुल गांधींनी गोंदिया येथील जाहीर सभेत दिला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)