लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकासह,शिक्षकावर गुन्हा दाखल

Shabd Sandesh
0
आरोपीमध्ये तिघांचा समावेश,मंडोखाल येथील घटना
     गोंदिया, दि.१३
      अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रशिक विद्यालय येथील परिचर पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्त्याची रक्कम काढून देण्याच्या नावावर १५००० रुपयाची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक तसेच एका खाजगी व्यक्तीवर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद केला आहे. प्रभारी मुख्याध्यापक विलास नाकाडे, सहाय्यक शिक्षक अशोक लंजे,व खाजगी व्यक्ती ज्ञानेश्वर नाकाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
    सविस्तर असे की,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रशिक विद्यालय टोला मंडोखाल येथे परिचय पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची तीन हप्त्याची राशी देण्यात यावी. यासाठी मुख्याध्यापकाकडे मागणी केली. त्यातच प्रभारी मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व खाजगी इसमाने त्या कर्मचाऱ्याकडून १५००० रुपयाची मागणी केली. मात्र पैसे देऊन सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम घेण्याची मुळीच इच्छा नसल्याने, त्या कर्मचाऱ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रभारी मुख्याध्यापक विलास नाकाडे,सहाय्यक शिक्षक अशोक लंजे व खाजगी व्यक्ती ज्ञानेश्वर नाकाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, यांच्या मार्गदर्शनात पोनी. राजीव कन्नमवार,पोनी. उमाकांत उगले,सफौ.करपे, मंगेश कहालकर,संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, संगीता पटले, रोहिणी डांगे, दीपक पाठबर्वे आदींनी पार पाडली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)