देवरी, दि.०७
भाजप आदिवासी सेलचे प्रदेश महासचिव शंकरलाल मडावी यांनी आमगाव मतदार संघात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षाने त्यांना निष्कासित केले आहे. यासंबंधीच्या कारवाईचे पत्र बुधवारी (दि.०६) काढले आहे.
आमगाव मतदार संघातून महायुतीतील भाजपचे उमेदवार संजय पुराम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपचे शंकरलाल मडावी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पक्षाच्या आदेशानंतरही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्ष शिस्तीचा भंग झाल्याने पक्षाने त्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत,पक्षातून निष्कासित केले आहे. बुधवारी यासंबंधीचे पत्र भाजप प्रदेश कार्यालय यांनी काढले आहे.