गृहनिर्माण अभियंता बोगस भरती; माहितीच्या अधिकाराला संबंधित विभागाने दाखविली केराची टोपली

Shabd Sandesh
0
शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या आरोप
   गोंदिया, दि.०७
               प्रधानमंत्री आवास योजने च्यां प्रभावी अंमलबजावणी साठी शासनाने ( जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया ) चे अंतर्गत आऊटसोर्सिंग कंपनी csc e -goverence pvt.LTD राज्य शासनाने नेमली . अणि प्रत्येक तालुका जिल्हा नुसार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नेमण्यात आले .तरी पण वरील शासन निर्णय नुसार ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांचे शैक्षनिक पात्रता किमान स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजनिअरिंग) अशी असणे बंधनकारक आहे.
      सध्या जिल्ह्यात गृहनिर्माण अभियंता याची पात्रतेचे माहिती मागण्या साठी माहिती अधिकार अपील करून मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष गोंदिया (शरद पवार ) गट यांनी माहिती मागितली .
पण जिल्हा परिषद गोंदिया प्रशासन माहिती देण्यास दुर्लक्ष करीत आहे.असा आरोप मिथुन मेश्राम यांनी केला आहे
       मागील काही महिन्या पूर्वी ५-६ ग्रामीण गृह अभियंता याची नियुक्ती करण्यात आली परंतु त्याचे शैक्षणिक पात्रता ITI डिप्लोमा असल्याचे दिसून आले .
तरी पण अभियंता चे नियुक्ती ने आणि zp गोंदिया याच्या कडून माहिती मिळत नसल्याने शासन निर्णययाला केराची टोपली दाखवल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याचे प्रमाण वाढल्याचे  दिसून येत  .
       तसेच 3 वर्षा पूर्वी 9 बोगस अभियंते असल्याचे समोर आल्या नंतर कार्यवाही करण्यासाठी ( Notsheet) टिप्पणी तयार करण्यात आली होती परंतु सर्व बोगस अभियंते आज ही प्रशासनात कार्यरत आहेत. जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मांगवीली असता,संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. अपील केल्यानंतर सुद्धा कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)