गोंदिया, दि.०७
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध मार्गाने भिवखिडकी रस्त्याच्या कडेवरून जात असलेल्या ट्रॅक्टरला मौजा मुंगली गावाजवळ एका भरधाव वाहनाने ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने कार मध्ये असलेले प्रवासी जखमी झाले. ही घटना ०५ नोव्हेंबर ची आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी चोपेंद्र शालिकराम नाकाडे (३९) रा. देवलगाव हा ट्रॅक्टरने क्र. एम. एच.३५ ए.जी.०९७० मौजा नवेगाव बांध मार्गाने भिवखिडकीला जात होते. त्यातच मुंगली गाव परिसरात सानगडी मार्गाने येणाऱ्या सुशील रूपलाल वरठी यांनी आपल्या ताब्यातील वाहन क्र. एम.एच.३१ सी.एस.३९९० वाहन भरधाव वेगाने चालवत असल्याने, वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार ने ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या अपघातात कार उलटल्याने कार चालक व प्रवासी जखमी झाले. तसेच ट्रॅक्टरचे नुकसान झाले. दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून कार चालकाविरुद्ध नवेगाव बांध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.