लग्नाचे आमिष दाखवून, तरुणीची फसवणूक; गुन्हा दाखल

Shabd Sandesh
0
आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
     शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
तुमसर, दि.२३ डिसेंबर २०२४
  
     एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाच्या आम्हीच देऊन शोषण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीने येथिल साई लॉज, हसारा टोली तुमसर येथे पीडितावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
     आरोपीने दि.१ मार्च २०२४ पासून वारंवार पिडीतावर अत्याचार केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.पीडित फिर्यादीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राजेंद्र गणपत करकाडे (२७) रा. मोहाडी खापा, जी.भंडारा यांनी प्रेम संबंधाच्या आधारावर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने लग्नास नकार दिल्याने फसवणूक झाल्याची जाणीव होऊन फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर घटना दीर्घ कालावधीची असून पिढीताच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे यांनी भारतीय दंड विधान कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सयाम करीत आहेत. (ता.प्र.)

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)