ग्राम लोहारा येथील दुचाकी अपघातात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

Shabd Sandesh
0
देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम लोहारा येथील घटना..
    शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२३ डिसेंबर २०२४

     डी फार्म अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी परीक्षा घेऊन घरी जात होता. लोहारा गाव शिवारात रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने धडक दिली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला. ही घटना १० डिसेंबरच्या सायंकाळी ६:०० वाजता सुमाराची आहे.
    सविस्तर असे की, फिर्यादी शामराव गौतम रा. मोहनटोला/ लोहारा यांचा मुलगा देवरी येथील डी.फार्म. कॉलेजमधून परीक्षा देऊन गावी जाण्यासाठी निघाला. दरम्यान तो ऑटो रिक्षाने लोहारा येथे पोहोचला. लोहारा बसस्थानकावर रस्ता ओलांडत असताना, दुचाकी क्र. एम.एच. २७ बी.एस.२६१० च्या चालकाने  लापरवाही ने चालवून त्याला जबर धडक दिली.
    या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. दरम्यान उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून अपघाताला कारणीभूत असलेल्या दुचाकी चालकाविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)