पुण्यात भीषण अपघात; भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
पुणे, दि.२३ डिसेंबर २०२४

     महाराष्ट्रातील पुण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डंपरच्या चालक दारूच्या नशेत होता. भार्गव बिल्डव्हेज इंटरप्राईजेस च्या नावाने डंपर नोंदणीकृत आहे. जखमी पैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोली येथील केसनंद नाका येथील पोलीस ठाण्यासमोर रात्री १२:०० वाजल्यानंतर ही घटना घडली.
  पुणे शहर पोलीस झोन ४ डीसीपी हिंमत जाधव यांनी सांगितले की, पुणे शहरातील वाघोली चौक परिसरात काल रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास फूटपाथ वर झोपलेल्या दोन मुलासह तिघांना डंपर ट्रॅकने चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. मंद्यधुंद चालकाला मोटार वाहन कायदा संबंधित कलमाखाली पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)