धुळे जिल्ह्यात शिवशाही बस आगीत खाक;मुंबई आग्रा महामार्गावरील घटना..

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
धुळे,दि.२३ डिसेंबर २०२४

    शिवशाही बसच्या मागे लागलेलंउ शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीये. दि.२२ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास शिवशाही बस आगीमध्ये जळून खाक झाली आहे. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ ही घटना घडली आहे. शिवशाही बस या आगीत जळून पूर्णपणे खाक झाली आहे, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही शिवशाही बस धुळ्याकडून शिरपूरकडे जात होती. शिवशाही बसला नेमकी आग का लागली? याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.
    बसला आग लागल्याचं समजताच सगळे प्रवासी आणि ड्रायव्हर तत्परतेने गाडीच्या बाहेर पडले. तसंच लगेचच अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली, पण ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण शिवशाही बसचा आगीत कोळसा झाला. बसला लागलेल्या या आगीमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅफिकही झाला होता.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)