जन्म-मृत्यूवेळीच नोंदवा..

Shabd Sandesh
0
   शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२३ डिसेंबर २०२४

स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा रुग्णालयात जन्म व मृत्यूची नोंद करणे आवश्यक असले तरी, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करतात.ही नोंद वेळेत न झाल्यास नातेवाईकांना कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यामुळे वेळीच दाखला घेतलेला बरा. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी नातेवाईकांनी सतर्क राहून जन्ममृत्यूची नोंद वेळेत करणे गरजेचे आहे.
  ग्रामपंचायत हद्दीत जन्म किंवा मृत्यू झाल्यास ग्रामपंचायतीला नोंद करावी. शहरी भागात नगरपालिकेत तशीच नोंद करावी अन्यथा कोर्टात जावे लागते.
   जन्ममृत्यूची नोंद २१ दिवसाच्या आत संबंधित अधिकारी मोफत करून देतात. एक वर्ष उलटूनही जन्ममृत्यूची नोंद झाली नाही तर,न्यायालयाचे आदेशानंतर जन्म किंवा मृत्यूचा दाखला निर्गमित केला जातो. 
   ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यामुळे वेळीच जन्ममृत्यूची नोंद करणे केव्हाही चांगलेच असल्याचे बोलल्या जात आहे. जन्ममृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करता येते. नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी व शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक त्याची नोंद ठेवतात. 
   घरी प्रसुती झाल्यास बाळाच्या जन्माची नोंद आशा वर्कर, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)