सोशल मीडियाने बळावला संशय.!

Shabd Sandesh
0
मोबाईलच्या अतिरेकामुळे सुखी संसारात वाढला दुरावा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते पती-पत्नीचे प्रकरण...

    शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.२४ डिसेंबर२०२४

    अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. मात्र या सोशल मीडियामुळे काही जणांच्या कुटुंबात वीष कालवले जात आहे. एकमेकावर संशय निर्माण झाल्याने सुखी संसारात दुरावे निर्माण झाले आहेत. सोशल मीडियाने अख्खे जग जवळ आणले आहे.
    जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीसोबत मैत्री करता येते. मैत्रीचे बंधन न पाडल्यास पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. ही बाब पुरुष व महिलांबाबतही घडते. हे संबंध जेव्हा उघड होतात तेव्हा मात्र घरीच स्फोट झाल्याशिवाय राहत नाही.या मोबाईलमुळे सुखी संसारात अनेक तणाव निर्माण होत आहेत. फेसबुक,व्हाट्सअप, instagram च्या अतिवापरामुळे नवरा बायको तील संवाद कमी झाला आहे. थोडाही वेळ मिळाला तरी पती-पत्नी संवाद न साधता सोशल मीडियाचा वापर करतात. परिणामी एकमेकांना समजूनही घेतले जात नाही. यामुळे तक्रारीचा ओघ वाढून सदर प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत.
============================== 
मोबाईल हेच ठरतोय वादाचा मुख्य कारण
=======≠======================
कुटुंबात प्रत्येक सदस्यांकडे स्मार्टफोन आहे.प्रत्येक जण स्मार्टफोनचा वापर करताना दिसून येतात. यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यासही वेळ देत नाही. सातत्याने मोबाईल मध्ये डोकावून बघितल्या जात असल्याने एकमेकांच्या समस्या, भावना समजून घेतल्या जात नाहीत.परिणामी कुटुंबातील ओलावा कमी करून दुरावा वाढण्याला मोबाईल कारणीभूत ठरत आहे.
===============================
हे तक्रारीचे झाले कारण...
=============================
सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करण्याऐवजी जुन्या मित्र मैत्रिणीची संवाद साधने,नातेवाईकांची आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवण्यामुळे संशयाची भावना दोघांमध्ये बळावते. पत्नी सतत सोशल मीडियावर व्यस्त राहते, कुटुंबासाठी वेळ देत नाही. मुलांकडे लक्ष नाही.आदी प्रकारच्या तक्रारी पुरुष मंडळी करीत असतात.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)