दुहेरी खूनामुळे बार्शी तालुका हादरला;आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
बार्शी, दि.२४ डिसेंबर २०२४
शेतीच्या वाटणीच्या भांडणावरून पुतण्यानेच धारदार शस्त्राने चुलत भाऊ आणि चुलती अशा दोघांच्या खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील भोयरे येथे घडली आहे.
सागर किसन पाटील (३०) सिंधू किसन पाटील (४५) रा.भोयरे ता. बार्शी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमी किसन पाटील(५५) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी सौदागर पाटील व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सौदागर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक परजने यांनी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील शेतीच्या पाऊलवाट कारणावरून वादाचे कारण असल्याचे सांगितले जात आहेत. हा वाद अनेक दिवसापासून सुरूच होता. अखेर शेवटी खुनाच्या रूपात स्थानांतर झाले आहे. खुनाच्या घटनेने बार्शी तालुका हादरला आहे.पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.