लाडक्या बहिणींना २१०० नव्हे, १५०० रुपये.!

Shabd Sandesh
0
परत येऊ लागले पैसे जमा झाल्याचे एसएमएस
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
 देवरी, दि. २८ डिसेंबर २०२४

        महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल. असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. मात्र त्यांचेच महायुतीचे सरकार नव्याने स्थापन झाले तरीही, पात्र असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली.
   मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यास एक जुलैपासून सुरुवात झाली. त्यावेळी अर्ज भरण्याची शेवटची १५ जुलै होती. परंतु अर्ज अधिक येतील महिलांना लाभ मिळणार नाही. यामुळे मुदतवाड देत ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख केली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज स्वीकारले गेले. अर्ज भरण्यासाठी मोठा कालावधी मिळाल्याने जिल्ह्यातील लाखो महिला पात्र ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला. त्यामुळे महिलांना महायुती सरकार बद्दल एक विश्वास निर्माण झाला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २१०० रुपयाची आश्वासन पूर्ण न करता,१५०० रुपये दिले याबद्दल महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 
       लाडक्या बहीण योजनेचा अधिक प्रभाव
    विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले अन पुन्हा महायुतीची सत्ता आली. सरकार स्थापन होऊन नुकतेच खाते वाटप झाले आहे. महायुती पुन्हा सत्तेवर देण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या मोठा वाटा होता. असे राजकीय तज्ञांनी निवडणूक निकालानंतर सांगितले. सत्ता स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या पहिला हप्ता २१०० रुपये मिळेल असे अपेक्षित होते. परंतु पूर्वीप्रमाणेच १५०० रुपये दिल्याने महिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)