तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात; गोरेगाव तालुक्यातील हेटी येथील घटना

Shabd Sandesh
0
पोलिसांनी खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढला,
 
   शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
गोरेगाव, दि.२८ डिसेंबर २०२४

       गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे ३ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. यावरून गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची घटना आज २८ डिसेंबरला घडली. मानसी ताराचंद चामलाटे (३) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुनिता ताराचंद चामलाटे  सोबत नागपूरच्या खापरखेडा येथे वास्तव्यास होती. यातच २६ डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला, असे तिने सांगितले. त्यांनतर २७ डिसेंबरला दुपारी गावातीलच स्मशानभूमीत मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला. मात्र मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात २७ डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान तक्रार दाखल केली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)