नववर्षात ४ ग्रहणे,११ उल्का वर्षाव, सुपरमूनची नवलाई

Shabd Sandesh
0
२०२५ मध्ये खगोलीय घटनांची रेलचेल;आकाश निरीक्षण प्रेमींना मेजवानी
  
        शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
     देवरी, दि.२९ डिसेंबर २०२४
 
 अनंत विश्वाच्या पसाऱ्यात अगणित खगोलीय घटना घडत राहतात. आगामी २०२५ वर्षात दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे अकरा उल्का वर्षाव, सुपरमून, धूमकेतू, ग्रहताऱ्यांची युती प्रति युती, ग्रह दर्शन, त्यांचे उदयास, राशी भ्रमण अशा अनेक खगोलीय घटनांची मेजवानी आकाशात निरीक्षण प्रेमींना मिळणार असल्याची माहिती जेष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.ह्या घटना पाहणी उत्सुकतेचे ठरणार आहे.
   तुटणाऱ्या तार्‍यांच्या स्वरूपात दिसणारा विविध रंगी उल्का वर्षाआरंभी ३ जानेवारीला होईल. त्यानंतर २२ एप्रिल, ५ मे, २८ जुलै, १२ व १३ ऑगस्ट, ५,१२ व १७ नोव्हेंबर, १४ व २२ डिसेंबरच्या रात्री आकाशात दिवाळीत सहभागी होता होईल.
   चंद्र आणि ग्रह यांची युती दरमहा घडत असून ग्रह व ग्रहांची युती एक अनोखी अनुभूती देते. अशी स्थिती १८ जानेवारीला पश्चिमेस शुक्र व शनी, २५ फेब्रुवारीला बुध व शनी ११, मार्चला बुध व शुक्र,१० व २५ एप्रिल रोजी अनुक्रमे बुध व शनी, शुक्र आणि शनी ८ जूनला,बुध व गुरु १४ ऑगस्टला,गुरु आणि शुक्र एकमेकांच्या जवळ पाहता येतील.
   नव्या वर्षात सूर्य चंद्राची प्रत्येकी दोन अशी एकूण चार ग्रहणे होणार असून यापैकी फक्त एकच ७ सप्टेंबर रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण सुमारे साडेतीन तास बघता येईल. १४ मार्च चे खग्रास चंद्रग्रहण २९ मार्च आणि २१ सप्टेंबर चे खंडग्रास सूर्यग्रहण मात्र भारतात दिसणार नाही.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)