"अबुआ दिशूम,अबुआ राज" नारा देत, स्वातंत्र्याचा शंखनाद केला- माजी आ.सहसराम कोरोटे

Shabd Sandesh
0
मौजा पांढरवानी येथे बिरसा मुंडा पुतळ्याचा अनावरण सोहळा थाटात साजरा
   शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी,दि.२९ डिसेंबर २०२४

      दि. २९ डिसेंबर २०२४ रोज रविवार ला देवरी तालुक्यातील कन्हाळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा पांढरवानी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला उद्घाटनावेळी उपस्थित असलेले माजी आ.सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र यांनी मार्गदर्शनात,"अबूआ दिशुम,अबुआ राज","वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही.अन आदिवासीचा नाद केला तर, अंगावर कातड सुद्धा राहत नाही." नारे देत भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांनी विरुद्ध स्वतंत्र भारतासाठी शंखनाद केला होता. बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना बाहेरील शासन आपलं शोषण करू शकत नाही असा संदेश दिला होता.
    सदर कार्यक्रमाला उपस्थित आ. संजयजी पुराम आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र, भरतशिंगजी दूधनांग संचालक आदिवासी विभाग,रमेशभाऊ ताराम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी,सौ.सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया,कल्पनाताई वालोदे जि.प.सदस्य गोटाबोडी,शामकलाताई गावळ पं.स.सदस्य मुर्दोली, समिता कटरे सरपंच,रेखाताई कुरसुंगे उपसरपंच कन्हाळगाव, राजेंद्र बिसेन सदस्य,जयराम कसोंडी सदस्य,अंकुश परतेकी सदस्य, योगराज भोंडेकर सदस्य,दुर्गाबाई मानकर सदस्य, श्वेता शहारे सदस्य, व गावातील,परिसरातील आदिवासी समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)