विदर्भासह राज्यात दोन दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.२६ डिसेंबर २०२४

     येत्या २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करावे. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
   येत्या शुक्रवारी दुपारपासून नंदुरबार,धुळे,जळगाव, अहिल्यानगर,जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात होईल.रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. यात बुलढाणा, अकोला, वाशिम,अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या भागात गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता असून विदर्भात हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा,नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या भागात काही प्रमाणात गारपीटीची शक्यता आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)