शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि.२६ डिसेंबर २०२४
रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना सुद्धा आता खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शासनाची ही कृती शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरणार आहे.
शेतमालाचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा खाली आले. हमीभावाने माल खरेदी करण्याची व्यवस्था नाही. परिणामी, शेतकर्यांना खासगी व्यापार्यांना माल विकावा लागत आहे, परंतू खासगी व्यापारी शेतकर्यांना अक्षरशः लुटत आहेत. शेतीच्या भरवशावर शेतकरी घराचा खर्च, मुलीच्या लग्नात खर्च, आपाल्या मुलांना शिक्षणाचा खर्च पुर्ण शकत नाही. अशातच खत कंपन्यानी खताची भाववाढ जाहीर केली आहे. त्यानुसार डीएपी खत १३५० वरून १५९० रुपये, ट्रीपल सुपर फॉस्फेट १३०० वरून १३५० रुपये, दहा, सव्विस, सव्विस १४७० वरून १७२५ रुपये व बारा, बत्तीस, सोळा खत १४७० वरून १७२५ रुपये होणर आहे. शेतकर्यांवर अन्याय करणारी ही वाढ असून, शेतमालाचे भाव कमी होत असताना खतांची भाववाढ करून सरकार शेतकर्यांचा रोष ओढवून घेत आहे..
..............
शेतमालाच्या भावाचे काय?
शासनाकडून शेतमालाल हमी भाव जाहिर करण्यात आले. मात्र हमी खरेदी केंद्रावर घेऊन गेलेल्या शेतमालाला ओलाव्याचे कारण समोर करून परत पाठविण्यात आल्याचा अनुभव जिल्ह्यातील अनेक शेतकर्याना आला आहे. त्यामुळे ना इलाजास्तव शेतकर्याना शेतमाल व्यापार्याच्या घशात घालावा लागला. शासन शेतकर्यांच्या पाठिशी असल्याचे सांगते खरे मात्र त्यांचेही दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळे असल्याचे निर्णयावरून दिसून येत आहे.