आधार, बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू; एकाच योजनेचा मिळेल लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्य संपादक संदेश मेश्राम
देवरी,दि. 25 जानेवारी 2025
शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ घेताना महिलांनी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतला आहे. त्यामुळे ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्यांना आता निराधाराचे पैसे मिळणे बंद होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दिले जातात.मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर, निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी आधार बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनांचा लाभ बंद होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा आणि निराधार या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी यांनी प्रशासनाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले होते.
आधार,बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू
कोणत्याही एकाच योजनेच्या लाभ देण्यासाठी आता महिलांचे आधार, बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ती कागदपत्रे जमा झाल्यास त्यावरून तपासून दोन्ही लाभ घेणाऱ्या महिलांचा एक लाभ बंद करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.
तर फेब्रुवारीपासून अनुदान बंद
निराधार योजनेच्या आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळेल त्यासाठी त्यांना कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांचे फेब्रुवारीपासून अनुदान बंद होणार आहेत कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देता येईल असे शासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार कारवाई केली जात आहे.
